आनंदी जीवन फाउंडेशन संस्थ्येबद्दल

नमस्कार मित्रांनो, मी आनंदी जीवन फाउंडेशन चा एक कार्यकर्ता बोलतो आहे, मी नेहमी तुम्हा सर्वांना सांगत असतो, की फाऊंडेशन हे आम्हा एकट्याचे नसून आपल्या सर्वांचे आहे, मागील 3 वर्षा पासून आपल्या सर्वांच्या सहकायनि आपण ” एक हात मदतीचा करू उद्धार समाजाचा” या संकल्पनेतून नेहमी समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,

यासाठी आपल्या आनंदी जीवन फाउंडेशनच्या माध्यमांतून आपण मागील 3 वर्षापासून (2019 ते 2022) या काळात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामधून आपण सामजिक हिताचा विचार करून कोविड- 19पर्यावरण, आरोग्य, महिला सबलकरण, शिक्षणं, स्वच्छता कर्मचारी यांना कोविड योद्धा सत्कार, मानसिक आरोग्या विचार करून समुपदेशन यासारखे कार्यक्रमातून नेहमी समाजाला देण्यासाठी वचनबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, पण हे केव्हा यशस्वी होईल, जेव्हा तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळेल तेव्हा, आता पर्यंत तुम्ही आनंदी जीवन फाउंडेशन वर खुप भरभरून प्रेम केले, प्रत्येक उपक्रमात चांगले सहकार्य मिळाले आहे, अपेक्षा करतो की, भविष्यात अजून चांगले सहकार्य मिळेल, कारण आपण सर्वांना अजून वेगवेगळे सामजिक उपक्रम, ” एक हात मदतीचा” यातून कार्य करायाचे आहे यासाठी आपण सर्वांना विनम्र विनंती व आवाहन करण्यात येते आहे की

1) जर तुम्हाला वाटत असेल मी पण एक हात मदतीचा या सहभागी होऊ इच्छितो. तर नक्कीच होऊ शकता. 2) या सामजिक उपक्रमासाठी तुम्हाला काही देणगी व मदत ही वस्तूच्या रुपात, आर्थिक स्वरूपात, देयांची असेल तर तुम्ही सढळ हाताने करू शकतो. 3) या मध्ये जे देणगीदार असेल त्यांना 80 Gअंतर्गत आयकर यात सुट मिळू शकते. 4) बऱ्याच लोकांना दान धर्म करण्याची इच्छा असते पण कुठे करू मझ्या पैशाचा योग्य वापर होईल का, गरजू लोकांना पर्यंत माझी मदत पोहचेल का ? असा प्रश्न पडतो. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, “तुमची मदत तुमचा हात ” यातून आपण देणार आहोत, त्या मध्ये तुम्ही दिलेली देणगी ही तुम्हीच देणार आहात. 5) संस्थेस 80G प्रमाणपत्र आहे. आपणास Income Tax आयकारात सूट पाहिजे असल्यास आपण मदत करू शकता 9797519797 मोबाईल वर संपर्क करू शकता.

आपली आनंदी जीवन फाऊंडेशन, पुणे संस्था विविध सामाजिक उपक्रमाद्वारे जनप्रबोधन व लोकहिताचे काम अखंडपणे करीत आहे. हे समाज सेवेचे व्रत केवळ एकट्या नाही, हे आम्ही जाणतो आपणासारखी माणसे आमच्या सोबत आहेत. म्हणून हे शक्य होत आहे. भविष्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस आहे. त्यासाठी वेळोवेळी उद्धभवनारी आर्थिक चणचण ध्यानात घेऊन आपणा सारख्या दानशुर व सामाजिक भान असलेल्या लोकांकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. आपण या खात्यावर आर्थिक मदत करू शकता देणगी विषयी आपण चेक डीमाड ड्रॉफ्टस * आनंदी जीवन फाऊंडेशन, पुणे या नावाने काढावेत.

Bank of Baroda

Scroll to Top